पदवीधर मतदार नोंदणीचा ऑनलाईन उपक्रम

1 min read

पदवीधर मतदार नोंदणीचा ऑनलाईन उपक्रम

पदवीधरांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा व घर बसल्या नोंदणी करता यावी यासाठी हा ऑनलाईन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

लातूर : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या असताना कोरोना कालखंडामध्ये घरबसल्या पदवीधरांना नोंदणी करता यावी यासाठी एक डिजिटल वेबसाईट लिंक बनवण्यात आलेली आहे. या लिंकचे शुभारंभ माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे, भाजपाचे गटनेते शैलेश गोजमगुंडे, भाजयुमोचे प्रदेश सचिव प्रेरणा होनराव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पदवीधरांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा व घर बसल्या नोंदणी करता यावी यासाठी ही लिंक बनवण्यात आलेली आहे अशी माहिती भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रेरणा होनराव यांनी दिली.लिंक मध्ये दिलेल्या दोन मोबाईल नंबर वरती फोटो आयडी, डिग्री किंवा शेवटच्या वर्षाच्या मार्क्स मेमोची स्कॅन कॉपी व फोटो पाठवला असता, मतदारांची नोंदणी केली जाईल व त्यांना टोकन पाठवून देण्यात येईल, अशीही माहिती प्रा. प्रेरणा होनराव यांनी दिली....