मराठवाड्यातील किसानपुत्रांचे ऑनलाईन शिबिर

1 min read

मराठवाड्यातील किसानपुत्रांचे ऑनलाईन शिबिर

उदघाटन शेषराव मोहिते, समारोप अमर हबीब करणार

मराठवाड्यातील किसानपुत्रांचे ऑनलाईन शिबीर 1 ते 10 डिसेंबर या कालावधीत होत असून त्यात सुमारे दीडशे शिबिरार्थी भाग घेत आहेत. नांदेड व बीड जिल्ह्यातील शिबिरार्थींची संख्या सर्वाधिक असून शेतकरीविरोधी कायदे या विषयावर होणाऱ्या या शिबिराचे उदघाटन सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ. शेषराव मोहिते (लातूर) करणार असून अमर हबीब (आंबाजोगाई) यांच्या व्याख्यानाने समारोप केला जाणार आहे.

शिबिरात अनेक मान्यवर बोलणार आहेत. डॉ. विकास सुकाळे, नांदेड (सिलिंग कायदा), सुभाष कच्छवे, परभणी (आवश्यक वस्तू कायदा), ऍड संध्या भूषण पाटील, औरंगाबाद (जमीन अधिग्रहण कायदा), अमृत महाजन, आंबाजोगाई (शेतकरीविरोधी घटनांदुरुस्त्या), प्रा. डॉ. शैलजा बरुरे आंबाजोगाई (सर्जकांचे स्वातंत्र्य) यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने होतील. त्यावर शिबिरार्थी चर्चा करू शकतील. वरील व्याख्यात्यांशीवाय प्रा. सुधाकर गोसावी (आंबाजोगाई), अंकुश खानसोळे (नांदेड), एकनाथ कदम (परतूर, जालना), नरसिंग देशमुख (देगलूर, नांदेड), डॉ उद्धव घोडके (गेवराई, बीड), इंजि. प्रशांत शिनगारे (बीड-पुणे), असलम सय्यद (आंबाजोगाई-पुणे) व अन्य किसानपुत्र मनोगत व्यक्त करणार आहेत.

दररोज रात्री 8 ते रात्री 8.30 या वेळात शिबीर चालेल.

किसानपुत्र आंदोलन ही संघटना नाही.  शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हावे यासाठीची चळवळ आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसलेली शेतकरी स्वातंत्र्याची चळवळ आहे. शेतकरीविरोधी कायदे शेतकऱयांच्या मुला-मुलींना समजावेत म्हणून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.