गणेश मुंडे/उदगीर :कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरशेळकी येथे. कोविड कॅप्टन नियुक्ती करण्यात आली असल्याचे केंद्रीय मुख्याध्यापक नरसिंग विठ्ठल रोकडे यांनी कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा परिषद शाळेत कोविड कॅप्टनची नियुक्ती करण्याचे निर्देशित दिले होते.
या शैक्षणिक संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोविड कॅप्टन द्वारा नुकसान भरुन काढताना विदयार्थ्यांना अभ्यासक्रमाशी जोडता येते. म्हणून शाळेत कोविड कॅप्टनची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी कोविड कॅप्टन ही संकल्पना योग्य रितीने राबविण्याचे ठरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे 11 गट तयार करण्यात आले आहेत. 11 कोविड कॅप्टनची नियुक्ती करुन या गटाला विद्यार्थी जोडून दिले आहेत.
या विद्यार्थ्यांना हे कोविड कॅप्टन कोरोना शैक्षाणिक दिनदर्शिका विषयी जनजागृती करत आहेत. शिवाय दररोज विद्यार्थ्यांना दोन तास मार्गदर्शन करत असल्याचे मुख्याध्यापक श्री नरसिंग विठ्ठल रोकडे यांनी सांगितले. उपक्रमास सहभागी शिक्षक श्री रेड्डी, श्री जाधव,श्री मुगदाळे, श्रीमती फड, श्रीमती केंद्रे माया, श्रीमती कोल्हे, श्रीमती शिवपुजे आदींनी सहकार्य व परिश्रम घेतले. हा उपक्रम घेत असल्याने पालकांना आनंद व्यक्त केला आहे.
ऑनलाईनच्या नेटवर्कसाठी कोविड कॅप्टन.
डोंगरशेळकीच्या शाळेचा अभिनव उपक्रम. शैक्षाणिक दिनदर्शिका कोविड कॅप्टन शिक्षकांमार्फत मार्गदर्शन चालू.

Loading...