ऑनलाइन व्यापार पद्धती तात्काळ बंद करा.

1 min read

ऑनलाइन व्यापार पद्धती तात्काळ बंद करा.

ई-कॉमर्स कंपनीच्या विरोधात हिंगोली येथे प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन.

हिंगोली: ई-कॉमर्स कंपन्यांनी देशातील लहान व मध्यम व्यापाऱ्यांना देशोधडीला लावलेले आहे. या कंपन्यांच्या विरुद्ध केंद्र शासनाने कायदा करून ऑनलाइन व्यापार पद्धती तात्काळ बंद करावी. या करीता अखिल भारतीय व्यापारी महासंघाशी संलग्न असलेल्या, हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे वतीने या कंपन्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
WhatsApp-Image-2020-10-25-at-4.18.21-PM-1
हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने ई-कॉमर्स कंपनीच्या विरुद्ध राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलेे आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण देशात दसऱ्याचे औचित्य साधून या कंपन्या विरूद्ध देशव्यापी अंदोलन सुरू करण्यात आले आहे. हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाने आज या कंपनीच्या विरुद्ध प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत आंदोलन केले. यावेळी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.