थेट उपविभागीय अधिकारीच ऊतरले रस्त्यावर

संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या व्यक्ती व व्यापार्‍यांविरूध्द आपण माणूसकीच्या दृष्टीकोनातून आज दंडात्मक कारवाई केली नाही,सातत्याने व्यापार्‍यांनी दुकाने उघडी ठेवली तर नाईलाजास्तव दंड आकारावा लागेल,

थेट उपविभागीय अधिकारीच ऊतरले रस्त्यावर

परभणीः कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य व जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदी दरम्यान रस्त्यावरून विनाकारण भटकणार्‍यांसह अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त दुकाने उघडी ठेवणार्‍या व्यापार्‍यांना उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी गुरुवार दि.15 रोजी रस्त्यावर ऊतरुन समज दिली.

डॉ. कुंडेटकर गुरुवारी बाजारपेठेत दाखल झाले. शहरातील जनता मार्केट, कच्छी बाजार, शिवाजी चौक, गुजरीबाजार, गांधीपार्क, अष्टभुजा चौक या भागात त्यांनी फेरफटका मारला. त्यावेळी अत्यावश्यक सेवांव्यतिरीक्त काही दुकाने उघडीच होती. कुंडेटकर यांनी थेट रस्त्यावर उतरत व्यापार्‍यांना कठोर शब्दात समज दिली. यापुढे दुकाने उघडी दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.

फेरफटका मारते वेळी काही वाहनधारकांना रस्त्यात अडवुन फिरण्याची कारणेही विचारली. काहींनी अडचणी सांगितल्या तर काही किरकोळ कारणे सांगितली. त्यामुळे डॉ. कुंडेटकर हे चांगलेच संतापले. अत्यावश्यक कारण असल्याशिवाय बाहेर पडू नका, असा वाहनधारकांना दम दिला. काही युवकांनी डॉ. कुंडेटकर यांचे वाहन पाहताच पळ काढला. डॉ. कुंडेटकर यांच्या या फेरफटक्याने मुख्य बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त असेलली दुकाने क्षणार्धात बंद झाली. तर गर्दीची असलेली ठिकाणे निर्मनुष्य झाल्याचे यावेळी पहावयास मिळाले.

दरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या व्यक्ती व व्यापार्‍यांविरूध्द आपण माणूसकीच्या दृष्टीकोनातून आज दंडात्मक कारवाई केली नाही. मात्र, सातत्याने व्यापार्‍यांनी दुकाने उघडी ठेवली तर नाईलाजास्तव दंड आकारावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.