लॉकडाउनला विरोध करत, खा. उदयनराजे कटोरा घेऊन रस्त्यावर बसले

खा. उदयनराजे भोसले यांनी पोवई नाका येथे झाडाखाली कटोरा घेऊन बसत भीक मांगो आंदोलन केले

लॉकडाउनला विरोध करत, खा. उदयनराजे कटोरा घेऊन रस्त्यावर  बसले

साताराः राज्य सरकारच्या लॉकडाऊनला विरोध करत भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी सातारा येथील पोवई नाका येथे झाडाखाली कटोरा घेऊन बसत भीक मांगो आंदोलन केले आहे. दरम्यान, कटोऱ्यात जमा झालेले पैसे शासकीय अधिकाऱ्याकडे जमा करणार असल्याचेही उदयनराजेंनी सांगितले आहे. यावेळी विविध विषयांवर उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारवर टिका केली.

लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी आज उदयनराजे यांनी सातारा येथे अनोखे आंदोलन केले आहे. यावेळी त्यांनी सचिन वाझे प्रकरण, करोना लसीकरण व लॉकडाउनवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. करोना थोपवण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय आहे असे कोणत्या तज्ज्ञांनी सांगितले आहे, हे जनतेला कळायला हवे, असे म्हणत उदयनराजेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

या आंदोलनामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली. भीक मांगो आंदोलन करताना जमा केलेले ४५० रुपये खा. उदयनरांजेनी चालत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ती रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधीन कडे जमा केली. गोरगरिब जनतेच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहणार असुन राज्य सरकारणे लॉकडाउनच्या नियमावलींचा पुर्नविचार करावा अशी मागणी केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.