येलदरीच्या डाव्या कालव्यात बाबत पाटबंधारे महामंडळाला आदेश.

1 min read

येलदरीच्या डाव्या कालव्यात बाबत पाटबंधारे महामंडळाला आदेश.

संदेश देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

हिंगोली: पूर्णा नदीवर उभारण्यात आलेेल्या व हिंगोली जिल्ह्यात असलेल्या येलदरी धरणातून डावा कालवा निर्माण करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवर पाठपुरावा सुरू असला तरी राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांनी या प्रश्नाची दखल घेऊन गोदावरी पाटबंधारे मंडळाला आदेश देत सदर कालवा संदर्भात तांत्रिक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात असणाऱ्या येलदरी धरणातून डावा कालवा निर्माण करीत जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यात यावा. यासाठी अनेक वर्षांपासून निवेदने सादर होत आहेत. जिल्ह्यातील सेनगाव तालुका हा सर्वाधिक दुष्काळग्रस्त तालुका आहे. अनेक वर्षी दुष्काळामुळे या तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे येलदरीतून डावा कालवा निर्माण केल्यास सेनगाव तालुक्या सह आजूबाजूच्या परिसराचा सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. यासंदर्भात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी पुढाकार घेतला असून डावा कालवा निर्मिती करीता जन आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
याबाबत त्यांनी शासनाकडे निवेदन देखील सादर केले होते. याची दखल घेऊन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या औरंगाबाद मुख्य अभियंता यांना आदेश दिले आहेत. सदर कालवा निर्मिती करीता तात्काळ सर्वेक्षण करून त्याचा तांत्रिक अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बच्चू कडू यांनी दखल घेऊन आदेश दिल्यामुळे कालवा निर्मितीच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी बच्चू कडू यांचे आभार व्यक्त केले असून. येणाऱ्या काळातील सर्वेक्षण आणि तांत्रिक अहवाल पूर्णत्वाच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.