जिल्ह्यात स्वच्छता मोहिमेअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेसाठी सामूहिक श्रमदान मोहीम जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात

जिल्ह्यात स्वच्छता मोहिमेअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

परभणी : केंद्र व राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने सुरु असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामीण भागामध्ये विविध स्वच्छता विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आधारित दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेसाठी सामूहिक श्रमदान मोहीम जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. १५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर २०२१ या कालावधी राज्य शासनाच्या वतीने मध्ये स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या कालावधी मध्ये एकदा वापरण्यात येणारे प्लास्टिक, (सिंगल युज प्लास्टिक) बंदी बाबत ग्रामपंचायतने कार्यवाही करणे, गाव हागणदारी मुक्त अधिक ( ओ डी एफ प्लस ) घोषित करण्यासाठी तारीख निश्चित करणे, ऑनलाईनद्वारे सरपंच संवाद, २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करणे, ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छाग्रही , स्वच्छता प्रेरक व स्वच्छतेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकाचा सत्कार करणे आदी असे उपक्रम या मोहिमेदरम्यान राबवले जाणार आहे.

तसेच १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियाना अंतर्गत गावा - गावात वैयक्तिक शोषखड्डे निर्माण करणे, हागणदारीमुक्त अधिक (ओ डी एफ प्लस) अभियाना मार्फत घोषवाक्य लेखन स्पर्धा व सार्वजनिक ठिकाणच्या भिंती रंगविणे, स्वच्छता श्रमदान फेरी असे विविध उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.