आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी व खासगी मदतनीसास उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक.

वाटणीपत्राआधारे फेर मंजूर करून 7/12 नोंद घेण्यासाठी मागितली होती लाच.

आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी व खासगी मदतनीसास उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक.

तुळजापूर : आईच्या नावावर असलेल्या शेत जमिनीच्या वाटणीपत्राआधारे फेर मंजूर आणि 7/12 नोंद करून घेण्यासाठी 8000 रुपयेच्या लाचेची मागणी करणाऱ्या महिला तलाठी व खासगी मदतनीसास उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून  सापळा रचून अटक करण्यात आली आहे.‌‌तक्रारदार पुरुष व त्यांचा भाऊ यांनी मौजे जवळगा मेसाई, ता. तुळजापूर येथे त्यांच्या आईच्या  नावावर असलेल्या शेत गट नंबर 329 मधील क्षेत्र 4 हे.6 आर व तक्रारदार यांचा भाऊ यांचे नावावर असलेल्या शेत गट नंबर 244 मधील 26 आर व शेत गट नंबर 246 मधील 17 आर या शेत जमीनीचे वाटणी पत्र 100 रू च्या  स्टँप पेपरवर नोटरी करुन  घेतले होते.  सदर वाटणीपत्राआधारे फेर मंजूर करून 7/12 नोंद घेण्यासाठी कागदपत्रे वडगाव लाख सज्जाच्या महिला तलाठी संजीवनी शिवानंद स्वामी यांच्याकडे दिले होते.‌‌या कामासाठी तलाठी संजीवनी स्वामी व त्यांचे खाजगी लेखनीक सुभाष नागनाथ मोठे यांनी तक्रारदार यांचेकडे 8,000/- रू. लाचेची मागणी केली.तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे संपर्क  साधून तक्रार दिली असता आज दि.२४/८/२०२० रोजी तुळजापूर येथील तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला. यावेळी तलाठी संजीवनी स्वामी यांना खासगी मदतनीस सुभाष मोठे  यांचे हस्ते ८०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले.याबाबत तुळजापूर पो.स्टे. येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.‌‌ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री.अरविंद चावरिया, अप्पर  पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रशांत संपते, पोलीस उपअधीक्षक, उस्मानाबाद यांनी केली. यासोबत  त्यांना पो.ह. रवींद्र कठारे,दिनकर उगलमुगले,पो. ना. मधुकर जाधव पो. शि. विष्णू बेळे, समाधान पवार,तावस्कर व चालक करडे यांनी मदत केली.‌‌कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे संपर्क  करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद (मो.नं.९५२७९४३१००) यांनी केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.