...नाहीतर आम्हीच २३ ऑगस्टपासून शाळा सुरू करू

आ. हरिभाऊ बागडे यांचा शासनाला इशारा

...नाहीतर आम्हीच २३ ऑगस्टपासून शाळा सुरू करू

औरंगाबाद: शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. शासनाने नियमावली तयार करून ज्ञानमंदिर असलेल्या शाळा सुरू कराव्यात. अन्यथा सोमवारपासून अर्थात २३ ऑगस्टपासून स्वनियमावली तयार करून औरंगाबादसह राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस एकाच दिवशी सुरू करण्यात येतील, असा इशारा माजी विधानसभा अध्यक्ष तथा भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी गुरूवारी (दि १९ ऑगस्ट) रोजी पत्रकार परिषदेत राज्य सरकारला दिला.

बागडे म्हणाले, ऑनलाईन शिक्षण सर्वसामान्य, गोरगरीब खेड्यापाड्यापर्यंत पोहचत नाही. कोरोना व सततच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोबाईल घ्यायला, इंटरनेट चालवायला पैसाच उपलब्ध नाहीत. अनेक खेड्यांमध्ये इंटरनेट पोहचत नसल्याने ऑनलाईन शिक्षण सुद्धा पोहचत नाही. शेतकरी, शेतमजूर यांची मुले शिक्षणापासून वंचीत राहू नये. शिक्षणात खंड पडून ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाऊ नयेत, यासाठी शासनाने शाळा, महाविद्यालये व खाजगी शिकवणी वर्ग १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा सरकारचा अध्यादेश कायम ठेवून त्वरीत परवानगी द्यायला हवी. सध्यस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन विद्यार्थी शिक्षणापासून बाजूला फेकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.