आमचे शेतकरी आत्मनिर्भर भारताचा आधार – नरेंद्र मोदी

1 min read

आमचे शेतकरी आत्मनिर्भर भारताचा आधार – नरेंद्र मोदी

देशाचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. मागच्या काही काळात या क्षेत्राने अनेक बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 27 सप्टेंबर रोजी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण सर्व लोक, नव्या पिढीला आपल्या महापुरुषांबद्दल, महान माता आणि भगिनींबद्दल कथांच्या माध्यमातून माहिती देऊ शकतो. कथाशास्त्र अधिक लोकप्रिय कसे करू शकतो, यासाठी पोषक वातावरण कशा प्रकारे तयार करता येईल, याचा विचार करून त्या दिशेने काम केले पाहिजे.

आपल्या पूर्वजांनी ज्या प्रथा सुरू केल्या होता, त्या किती महत्त्वाच्या होत्या आणि जेव्हा आपण त्यांचे पालन करत नाही. तेव्हा आपल्याला त्यांचा किती अभाव जाणवतो, याची जाणीव आपल्याला या काळात निश्चितच झाली असेल. अशीच एक प्रथा म्हणजे गोष्टी सांगण्याची कला आहे, असं ते म्हणाले.

देशाचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. मागच्या काही काळात या क्षेत्राने अनेक बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे, मला अनेक शेतकऱ्यांची पत्रे मिळत राहतात, या क्षेत्रात कशा प्रकारे बदल होत आहेत याबद्दल ते मला माहिती देत राहतात, असं मोदी म्हणाले.