आमच्या जमीनी खरडून गेल्या,छञपती संभाजीराजे समोरच फोडला टाहो....

1 min read

आमच्या जमीनी खरडून गेल्या,छञपती संभाजीराजे समोरच फोडला टाहो....

आमच्या जमीनी खरडून गेल्या आम्ही जगावे कसे सोनखेड वाशीयांनी छञपती संभाजीराजे समोरच फोडला टाहो....

निलंगा/प्रतिनिधी : नुकसानग्रस्त निलंगा तालुक्यात पहाणी करायला छञपती संभाजीराजे आले असता सोनखेड येथील शेतकऱ्यांनी टाहो फोडत 'महाराज, आम्ही जगावे कसे आता तुम्हीच सांगा..' अशी अर्त हाक ऐकताच महारांचे डोळे पाणावले...

निलंगा तालुक्यात मागे झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. तेरणा नदीकाठावरील सोनखेड, बोरसुरी, सरवडी, सावरी, मानेजवळगा औराद शाहजनी, तगरखेडा गुंजरगा जामगा येळणूर चांदूरी येथील शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त फटका बसला जमीनीवरील पिके तर वाहून गेली परंतु नदीच्या पाण्याने प्रवाह बदल्यामुळे बाजुच्या जमीनी सुध्दा खरडून गेल्या व जागेवर जमीनच राहिली नाही संपूर्ण जमीनीवर आत्ताही पाणी थांबले आहे.

छञपती संभाजीराजे बोरसुरी मार्गे नुकसानग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी वाहून गेलेल्या कोल्हापूरी बंधा-याची पहाणी करत असताना नदी पलिकडे सोनखेड शिवारातील जमीनी खरडून जाऊन नुकसान झालेले शेतकरी महाराज येणार आहेत म्हणून थांबले होते. नदी काठावर छञपती संभाजीराजे दिसताच मोठमोठ्यानी ओरडून सोनखेड येथील शेतकरी म्हणाले महाराज तुम्ही आलात आम्ही धन्य झालो हे सरकार आम्हाला मदत करत नाही. तुम्हीच आम्हाला मार्ग सांगा आम्ही काय करावे जगावे का मरावे? अशी परिस्थिती झाली आहे. आम्ही आता जगूच शकत नाही, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकताच महाराजांचे डोळे पाणावले मन सुन्न झाल अशा प्रतिक्रिया नुकसानग्रस्त भागाची पहाणी केल्यानंतर ट्वीटरवर हा व्हीडीओ शेअर करून व्यथा सांगितली आहे. 'हा प्रसंग बघण्यासारखा नाहीच. लवकर उपाययोजना केली पाहिजे,' हे वाक्य आहेत महाराष्ट्राच्या राजाचे....!

नुकसानग्रस्त निलंगा तालुक्यात पहाणी करायला छञपती संभाजीराजे आले असता सोनखेड येथील शेतकऱ्यांनी टाहो फोडत 'महाराज, आम्ही जगावे कसे आता तुम्हीच सांगा..' अशी अर्त हाक ऐकताच महारांचे डोळे पाणावले...