१२० पैकी निलंग्यात ११ बाधित, चार व्यापाऱ्यांचा समावेश..

९४ व्यापाऱ्यांची व २६ इतर अशा १२० जणांची तपासणी येथील उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आली

१२० पैकी निलंग्यात ११ बाधित, चार व्यापाऱ्यांचा समावेश..

निलंगा : शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली असून काल झालेल्या तपासणीत १२० पैकी ११ रूग्णांना कोरोणाची बाधा झाली आहे. तर यात चार व्यापाऱ्यांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे तहसील कार्यालयात व्यापारी, वैद्यकीय अधिकारी, पञकार यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्व व्यापारी कामगार यांची कोरोना चाचणी करूण घेणे बंधनकारक असल्याची सुचना केली होती. जे व्यापारी कोरोना चाचणी करणार नाहीत व मास्क वापरणार नाहीत अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई व दुकान परवाना रद्द करण्याची मोहिम राबवली होती. त्या अनुशंगाने शहरातील ९४ व्यापाऱ्यांची व २६ इतर अशा १२० जणांची तपासणी येथील उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आली. यात चार व्यापारी व सात इतर अशा एकूण ११ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. नगरपालिका,तहसील पोलिस यानी अनेक वेळा सुचना करूनही नागरिक व व्यापारी यांच्याकडून सर्रास उलंघन होत आहे. यामुळेच कोरोना रूग्णांत वाढ होत आहे. तरी देखील लोक शासनाच्या नियमांचे पालन करत असताना दिसत नाहीत.

**व्यापाऱ्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक तहासिलदार गणेश जाधव
**

शहरात गेल्या आठ दिवसात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामुळे तहसिलदार गणेश जाधव यांनी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. सर्वांनी चाचणी करूनच आपली दुकाने चालवावीत असे आदेश काढले आहेत. म्हणून व्यापारी सर्व व्यापाऱ्यांनी याची दखल घेऊन सतर्क रहावे अशा सुचना केल्या.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.