ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक

निटूरात आठ दिवसात तीघांचा मृत्यू ,गावात लसीकरणासाठी समोपदेशनाची तसेच निर्जंतुकीकरणाची गरज

ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक

निटूर/विजय देशमुख: ग्रामीण भागात कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण झाली असून आठ दिवसात निटूरात तीघांचा मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.गावात बाधीतांची संख्या वाढतच आहे. मात्र अद्यापही निर्जतुकिकरण कुठेच दिसत नाही त्यामुळे निटूरकरावर सध्या रामभरोसेच राहण्याची वेळ आली आहे .निलंगा तालूक्यातील मोठे गाव म्हणून निटूरकडे पाहीले जाते गावाला परीसरातील पंधरा ते वीस गावच्या लोकांचा व्यापारासाठी संपर्क असतो त्यामुळे साहजिकच वर्दळ असते त्यामुळे या ठिकाणी ग्रा. प. ने लक्ष ठेवून या कठीण काळात नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र सध्या गावात कोरोना मुळे भितीचे वातावरण असताना ग्रा. प. ची यंत्राना कुठेही कार्यान्वित दिसत नाही, की कुठे निर्जंतुकिकरण होताना दिसत नाही त्यामुळे ग्रामस्थांनी स्वतः ची काळजी स्वतः घेण्याची गरज निर्माण झाली आहे .

निटूरमध्ये बाधीत रूग्नांची संख्या मोठी आहे. रोज नविन रूग्ण समोर येत आहेत त्यातच गेल्या आठ दिवसात निटूरमध्ये तीघांचा मृत्यू झाल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. निटूर मध्ये अनेक नागरिक लस घेण्यापासून वंचीत आहेत लस घेतल्यानंतर ताप येतो अशी अनेकांची भावना झाल्याने कांही जण लस घेण्यास जात नाहीत त्यामुळे या संदर्भात गावामध्ये जागृती होणे गरजेचे आहे त्यामुळे ते ही करण्यास कोणी धजावत नसल्यामुळे निटूरातला कोरोना थांबणार कसा असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे . निटूर परीसरातील अनेक गावात कोरोना शिरकाव झाला आहे त्यामुळे त्या त्या गावातील नागरिक खबरदारी घेत आहेत त्यामुळे निटूरकरांनी स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी एवढेच आपल्या हाती आहे


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.