अजित पवारांचा अपमान म्हणत राष्ट्रवादीचा गोंधळ
पुणे- पणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी ७ हजार ३९० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रीकेच्या पुस्तीकेतील फोटोवरून महानगरपालीकेत चांगलाच गोंधल उडाला. अंदाजपत्रकाच्या पहिल्या पानांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला. तर तिसर्या पानांवर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांचा फोटो छापण्यात आल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी आक्षेप घेत याबद्दल निषेध नोंदवला.
सत्ताधारी भाजपने तिस-या पानावर फोटो छापण्यात अपमान करण्याचा हेतू नव्हता असे सांगत पुढील वेळेपासून पहिल्या पानावर फोटो घेऊ असे सांगितले. या गोंधळात बराच वेळ मनपाचे कामकाज होऊ शकले नाही.
अजित पवारांच्या अपमानाबाबत खुलासा करावा अन्यथा आम्ही सभागृह चालू देणार नाही, अशी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भूमिका घेतली. त्यामुळे काहीकाळ सभागृहाचं कामकाज थांबविण्यात आले होते.
उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या फोटो मागील पानावर छापण्यात कोणताही वाईट हेतू नव्हता, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. तसेच, याबद्दल संबधित विभागाने तातडीने दखल घेऊन पुढील बैठकीला पाहिल्या पानांवर फोटो घेण्यात यावा, असे त्यांनी आदेश त्यांनी दिले. मोदी यांच्या दुस-या शपथविधीच्या वेळी व्ही म्हणजे रोमन आकड्यातील पाच असा समज होऊन राष्ट्रवादीकडून हा शरद पवार यांचा अवमान असल्याचा मुद्दा उपस्थित केला गेला होता. तर भाजपकडून आणि पंतप्रधान कार्यालयाकडून व्ही म्हणजे व्हीआयपी असा खुलासा केला होता.
आता मात्र भाजपच्या महापौरांना माघार गेत पुढच्या वेळी पहिले पान असा शब्द द्यावा लागला.