पहिली ते बारावी पर्यंतचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

पहिली ते बारावी पर्यंतचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शाळेतील शिक्षण बंद आहे. विविध माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था करण्यात येत असताना विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण तणाव येऊ नये म्हणून राज्य शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमातील 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
15 जून पासून राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यास शासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे. दरम्यान ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विविध शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणामधील विविध अडचणी आणि विद्यार्थ्यांवर पडणारा ताण या बाबींचा विचार करता शासनाने यापूर्वीच ऑनलाइन शिक्षणासंदर्भात वेळा निश्चित करून दिल्या आहेत. दरम्यान या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर निर्माण होणारा तणाव व दडपण या बाबी लक्षात घेऊन शासनाने आदेश जारी केले आहेत. त्या नुसार इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील एकूण पाठ्यक्रमापैकी 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात आला असून यासंदर्भातची मार्गदर्शक सूचना राज्याचे शैक्षणिक संशोधक परिषदेच्या संचालकांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.