पालघर साधू हत्या प्रकरण,कारवाई सुरू

1 min read

पालघर साधू हत्या प्रकरण,कारवाई सुरू

18 पोलिसांवर डिसमिस करण्यापासून वेतन कपाती पर्यंतची कारवाई.

पालघर हिंसाचार प्रकरणात सामील असलेल्या पोलिसांवर कारवाई सुरू केली असल्याचे, महाराष्ट्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. पालघरमध्ये एप्रिलमध्ये झालेल्या जमावाच्या हिंसाचारात दोन साधूंसह तीन जणांचा मृत्यू झाला होता.
नौकरी वरून काढून टाकण्यापासून ते वेतन कपाती पर्यंत 18 पोलिसांवर कारवाई करण्यात आली. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर.एस.रेड्डी आणि न्यायमूर्ती एम.आर.शाह यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारला सांगितले की, त्यांनी गेल्या महिन्यात प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायालयात सर्व माहिती सादर केली होती. त्यात पोलिसांवर केलेल्या कारवाईचा उल्लेखही आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, डिसमिस करण्यापासून वेतन कपातीपर्यंतच्या 18 पोलिसांवर कारवाई करण्यात आली असल्याचे सरकारने सांगितले.
सीबीआय आणि एनआयएकडून स्वतंत्र चौकशी करावी. या मागणीसह अन्य याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. सुनावणीदरम्यान, एका याचिकाकर्त्याने असा दावा केला की, आपल्याला मंगळवारी रात्री 1000 पृष्ठांचे प्रतिज्ञापत्र मिळाले आहे. यावर खंडपीठाने शेवटच्या क्षणी उत्तर का दाखल केले, असा सवाल केला. खंडपीठाने याचिकाकर्त्याला सरकारची भूमिका मांडण्यासाठी मुदत देण्यात येईल.