पंचायत संमिती निकाल, 'मी ना आनंदी आहे ना दु:खी आहे'-अजित पवार

झेडपी, पंचायत समिती निवडणूक निकालांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

पंचायत संमिती निकाल, 'मी ना आनंदी आहे ना दु:खी आहे'-अजित पवार

मुंबई: राज्यातील काल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
या निकालाने मी ना आनंदी आहे ना दु:खी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये यापेक्षा मोठे यश मिळवू असे अजित पवार म्हटले आहे.

आज राज्यातील धार्मीक स्थळे खुली झाल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथेच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला झेडपी आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सगळ्याच ठिकाणी एकत्र लढलेली नव्हती. अनेक ठिकाणी तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. तिन्ही पक्षांच्या मतांची बेरीज केली तर ही मते खूप जास्त होतात. पण 'असे केले तर तसे आणि तसे केले तर असे' ह्याला काही अर्थ नाही, असे अजित पवार म्हणाले.

सध्याची राजकीय, सामाजिक व नैसर्गिक परिस्थिती पाहता निवडणुका होऊच नयेत असे अनेकांचे मत होते. मात्र, निवडणूक आयोगाने तारखा घोषित केल्या. त्यामुळे निवडणूक घ्यावी लागली. सभांना मर्यादा होत्या. स्थानिक कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने काम केले. जनतेने समाधानकारक निकाल दिलाय असे मला वाटते. आणखी कुठे आणि कशी दुरुस्ती करावी लागेल यावर आम्ही विचार करत आहोत. कालच्या निकालानंतर मुख्यमंत्री, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे असे आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. त्यात सविस्तर चर्चा झाली. पुढे कसे जाता येईल यावर विचारविनिमय झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विजयी उमेदवारांचे अभिनंदन
राज्यातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय मिळवलेल्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन अजित पवार यांनी केले. प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या हितरक्षणासाठी, ग्रामीण जनतेच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकजुटीने कार्य करतील. जनतेचा विश्वास संपादन करुन पुढील निवडणुकांमध्ये याहून मोठे यश मिळवतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.