पंढरपुर मध्ये 30 जुन पासून 2 जुलै पर्यंत संचारबंदी

1 min read

पंढरपुर मध्ये 30 जुन पासून 2 जुलै पर्यंत संचारबंदी

अत्यावश्यक सेवा सोबत परवानगी असलेल्या पासधारकांना सूट असेल. मंदिर प्रदक्षिणा किंवा नगर प्रदक्षिणासाठी पासधारकांशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही.

पंढरपुरः आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीच्या माध्यमातून दरवर्षी 12 ते 15 लाख वारकरी पंढरपुरात येतात. परंतू यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर ठरवून दिलेल्या मानाच्या पालख्यांनाच पंढरपुर शहरात प्रवेश दिला जाणार आहे. गर्दी होऊ नये यासाठी नाकाबंदीही केलेली असून 30 जून रोजी दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अशी महिती अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

वारकरी दरवर्षी न चूकता आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरच्या दिशेने वाटचाल करतात. परंतू कोरोनाच्या संकटाखाली यंदाची वारी चुकली आहे. आता पंढरपुरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. आणि एकादशीच्या दिवशी पास शिवाय कोणालाही पंढरपुर शहरात प्रवेश करता येणार नाही. त्यासाठी शहरात संचार बंदी लावण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून विनंती केली जात आहे. सर्व वारकरी तसेच भक्तांनी पंढरपुरात येवू नये. आपल्या घरातूनच विठ्ठलाचे दर्शन घ्यावे.

संचारबंदीत कोणाकोणाला सूट असेल.

  • या संचार बंदीत सर्व अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली आहे.
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना देखील सुट असेल.
  • ज्यांचाकडे परवानगी असेल अशा सर्व वारकऱ्यांना सुट असेल.

कडेकोट बंदोबस्त

मंदिर प्रदक्षिणा किंवा नगर प्रदक्षिणासाठी पासधारकांशिवाय कोणालाही प्रवेश देणार नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून बॅरिकेटिंग लावण्यात आले तसेच शहरात 1200 पोलीस कर्मचारी आणि 800 होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवला आहे. असे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.