पंढरपुरात पुन्हा संचारबंदी ग्रामपंचायतीचा निर्णय

1 min read

पंढरपुरात पुन्हा संचारबंदी ग्रामपंचायतीचा निर्णय

कोरोनाचा धसका अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाना बंद

औरंगाबादः कोरोना विषाणूच्या संसर्ग वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एका कडक संचारबंदी लावण्याचा निर्णय पंढरपूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या घेतला आहे. बुधवारीपासून 17 जून रोजी तीन दिवसांसाठी कडक संचारबंदी लावण्याची घोषणा केली आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. इतर सर्व आस्थापने बंद राहतील. संचारबंदीच्या आदेशाचे पालन न करण्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे संरपंच अख्तर शेख यांनी सांगितले.
मागील आठ दिवसांमध्ये पंढरपुर गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या काळावधीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळुन आले आहे. यावर उपाय म्हणून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्याचा निर्णय झाला आहे. अस महत्वाचे निर्णय विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

असा असेल जनता कर्फ्यू

 • बुधवारी 17 जूनपासून तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येमार आहे. या वेळी रुग्णालय व औषधी दुकाने उघडी असतील.
 • अत्याश्यक सेवा वगळता सर्व दुकाणे बंद असतील.
 • आदेशाचे उल्लंघन करुन दुकाने सुरु ठेवणा-यावर कारवाई करण्यात येईल.
 • दुकानदारांनी नियमांच उल्लंगन केल्यास 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात येणार आहे.
 • मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळुन आल्यावर 200 रुपये दंड वसूल करण्यात येईल
 • आरोग्य विभाग व आशा कार्यकर्त्या यांच्यातर्फ प्रत्येतक घराचे सर्वेक्षण केले जाईल.
 • नागरिकांना औषधीचे वाटप केले जाणार आहे.
 • गावात नव्याने चार अरोग्य सेवकाची नेमणूक करण्याच यावी यासाठी जि.प. प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
 • खाजगी डॉक्टरांची सेवा घेतली जाणार आहे.
  या बैठकीला सरपंच अख्तर शेख, उपसरपंच महेंद्र खोतकर ग्रामसेवक नारायण रावते, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब राऊत, अप्पासाहेब साळे, मेहबूब चौधरी, राजेंद्र खेतकर, अनिल कोतकर, तस्लीमल शेख, अंजीराबेगम शेख, फिरोजा शहा, पूजा उबाळे , सुमन खोतकर, मीरा गि-हे, संगीता गायकवाड, आदी उपस्थिती होती.