विजय कुलकर्णी/परभणी: छत्रपती संभाजी महाराज यांचेच नाव औरंगाबाद शहराला देण्यात यावे अशी मागणी करत भाजपा कामगार आघाडीच्या वतीने मंगळवार दि.१२ रोजी शहरातील बस स्टँडवरील परिवहन महामंडळाच्या बसेसवर "औरंगाबाद नव्हे केवळ छत्रपती संभाजी नगर" अश्या आशयाचे फलक लावण्यात आले.तसेच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
छत्रपतींचे राज्य हे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देणारे राज्य होते. दुर्दैवाने परकीय आक्रमक असलेल्या औरंगजेबच नाव शहराला आहे. हे नाव तात्काळ काढण्याची मागणी तमाम शिवभक्तांची असल्याचे सांगत, भाजपा कामगार आघाडी तर्फे "औरंगाबाद नव्हे केवळ संभाजी नगर" अश्या आशयाचे फलक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वर लावले गेले. यावेळी भाजपा सरचिटणीस दिनेश नरवाडकर, संजय रिझवाणी, भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष रोहित जगदाळे, संतोष जाधव, कामगार आघाडी सरचिटणीस मनोज देशमुख, शुभम शास्त्री, अभिजित मंगरूळकर, निरज बुचाले, विठ्ठल बेनशेळकीकर, सुनील ढसाळकर, गणेश कोपे, माऊली कोपरे, रोहन बागल आदी भाजपा कार्यकर्ते आणि पदाधकारी उपस्थित होते.