पंकजा मुंडे, विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सचिव

1 min read

पंकजा मुंडे, विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सचिव

भाजपच्या एकूण ५३ लोकांच्या कार्यकारिणीत महाराष्ट्र राज्यातील ५ लोकांना संधी मिळाली आहे.

भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील पाच जणांना तर मराठवाड्यातील तिघांना संधी देण्यात आली आहे. यात पंकजा मुंडे व विजया रहाटकर आणि सतीश वेलणकर ( व्ही सतीश) यांचा सामावेश आहे.
पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदी खा.तेजस्वी सुर्या, अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्ष पदी जमाल सिध्दीकी, सहसंघटन महासचिवपदी व्ही.सतिश यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये
१२ राष्ट्रीय उपाध्यक्ष,८ राष्ट्रीय सरचिटणीस १ राष्ट्रीय महामंत्री,३ राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री
१३ राष्ट्रीय सचिव,१ कोषाध्यक्ष , १ सहकोषाध्यक्ष , १ केंद्रीय कार्यालय सचिव,
१आयटी प्रभारी, ७ मोर्चाचे अध्यक्ष,
५ प्रवक्ते असा समावेश आहे. एकूण ५३ लोकांच्या कार्यकारिणीत महाराष्ट्र राज्यातील ५ लोकांना संधी मिळाली आहे.