पंतप्रधान नरेंद्र मोदी  सकाळी भारत–चीनच्या सीमेवर

1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी भारत–चीनच्या सीमेवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी भारत–चीनच्या सीमेवर असलेल्या लेह येथील तणावाच्या ठिकाणी पोहचले. पंतप्रधान मोदींची ही भेट अचानक होती, ज्याने सर्वांनाच धक्का बसला. पीएम मोदी यांच्यासमवेत संरक्षण संरक्षण प्रमुख (सीडीएस) बिपिन रावत हे देखील उपस्थित होते. सैन्य, हवाई दलाच्या अधिका-यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येथील भूमिकेविषयी माहिती दिली. मे पासून भारत–चीनच्या सीमेवर तणाव आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नीमूच्या फॉरवर्ड पोस्टवर पोहोचले. पीएम मोदी यांनी सैन्य, हवाई दलाच्या अधिका-यांशी थेट संवाद साधला. यापूर्वी केवळ सीडीएस बिपिन रावत या दौर्‍यावर येणार होते, पण पीएम मोदी स्वत: आले आणि सर्वांना आश्चर्यचकित केले.