परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वरपुडकर गटाचे वर्चस्व

२१ पैकी ११ जागा वरपुडकर गटाने सदस्य विजयी तर भाजपाचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाला ९ जागावर विजयी

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वरपुडकर गटाचे वर्चस्व

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार सुरेश वरपूडकर यांच्या गटातील ११ सदस्य विजयी झाले. तर माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाकडे ०९ जागा आल्या आहेत. गणेशराव रोकडे रोकडे हे अपक्ष निवडून आले आहेत. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील ५ आमदार, २ माजी आमदार आणि एक माजी खासदार यांचा समावेश आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची आज शहरातील कल्याण मंडपम येथे मतमोजणी झाली. यामध्ये आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलचे परभणीतून आमदार सुरेश वरपूडकर, सोनपेठमधून राजेश विटेकर, औंढ्यातून राजेश पाटील गोरेगावकर, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया गटातून माजी आमदार सुरेश देशमुख, वसमतमधून आमदार चंद्रकांत नवघरे, महिला प्रतिनिधी गटातून प्रेरणा समशेर वरपूडकर, अनुसूचित जाती गटातून अतुल सरोदे तर इतर मागास प्रवर्ग गटातून भगवान वाघमारे विजयी झाले आहेत. मानवत गटातून पंडितराव चोखट तर पूर्णा गटातून बालाजी देसाई आणि सेनगावमधून साहेबराव पाटील गोरेगावकर हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे २१ पैकी ११ जागा वरपुडकर गटाने पटकाविल्या. तर भाजपाचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये सेलूतून आमदार मेघना बोर्डीकर, महिला प्रतिनिधी गटातून भावना रामप्रसाद बोर्डीकर, कळमनुरीतून माजी खा.शिवाजी माने, इतर शेती संस्था गटातून आनंदराव भरोसे हे विजयी झालेत. तर विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघात वरपूडकर गटाचे अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार आणि बोर्डीकर गटाचे दत्ता मायंदळे यांना ७६१ समान मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये मायंदळे यांच्या बाजुने कौल लागल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या गटाचे यापूर्वीच जिंतूरमधून मा. आ. रामप्रसाद बोर्डीकर, गंगाखेडमधून भगवानराव सानप, पाथरीतून आमदार बाबाजानी दुर्राणी, हिंगोलीतून आ. तानाजी मुटकुळे हे बिनविरोध निवडले गेले आहेत. पालम गटातून अपक्ष गणेशराव रोकडे विजयी झाले आहेत.

दरम्यान, जिल्हा बँक वरपुडकर गटाने त्यांच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. वरपूडकर यांनी महाविकास आघाडी या निवडणुकीत स्थापन केली होती. परंतु राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी एका जागेवरुन बोर्डीकर गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली. निकालाअंती आ. दुर्राणी यांनी दिलेली साथ सद्य स्थितीत तरी बोर्डीकरांना सत्ता मिळवून देऊ शकली नाही.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.