परभणी ग्रा.पं. निवडणुकीतून ४३७ उमेदवारांची माघार

परभणीतून आता ५४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

परभणी ग्रा.पं. निवडणुकीतून ४३७ उमेदवारांची माघार

प्रतिनिधी / परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याची ४ जानेवारी ही अंतिम तारीख आहे. परभणी ग्रामपंचायत निवडणुकीतून ४३७ उमेदवारानी माघार घेतली असून परभणी तालुक्यात एक हजार ५४६ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले असल्याची माहिती डॉ.संजय  कुंडेटकर व तहसीलदार संजय बिरादार यांनी दिली.


परभणी तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी दोन हजार पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेतून दोन हजार पाच अर्ज वैध ठरले होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेवर संपूर्ण लक्ष केंद्रित झाले होते. पॅनलप्रमुख व स्थानिक पुढार्‍यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत अंतिम क्षणापर्यंत जोरदार खलबते, गुप्त बैठका, आमिषे वगैरे दाखवून प्रतिस्पर्ध्यांना रिंगणातून बाहेर करण्याकरिता या न त्या प्रकारे प्रयत्न केले. परंतु त्यास तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. एकूण ४३७ उमेदवारांनी माघार घेतली खरी. परंतु ८८ ग्रामपंचायतीत आता १ हजार ५४६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर व तहसीलदार संजय बिरादार यांनी दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.