परभणीचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, दोन कोटी रुपयांची  सुपारी.

1 min read

परभणीचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, दोन कोटी रुपयांची सुपारी.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

परभणी/सिद्धेश्वर गिरी: परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी माझ्या जीवाला धोका असून आपल्याला सुपारी देऊन जीवे मारण्याचा कट रचण्यात येत असल्याची तक्रार स्वतःपरभणी येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा दिली आहे.  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत आपल्याला सुपारी देऊन जीवे मारण्याचा कट रचल्याची तक्रार दिली आहे.  आपल्याला दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे,  असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचला आहे असेही खासदार संजय जाधव यांनी पोलिसांना सांगितले.मंगळवारी  नांदेडमधील रिंद्धा नावाची मोठी टोळी या प्रकरणी कार्यरत आहे.असे सांगत आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देणारा परभणीतील व्यक्ती असल्याचा असावा संशयरुपी आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे.