परभणीत दर्पण दिन साजरा

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, परभणी जिल्हा शाखेच्या वतीने दर्पण दिन साजरा

परभणीत दर्पण दिन साजरा

विजय कुलकर्णी/  परभणी : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, परभणी जिल्हा शाखेच्या वतीने  दर्पण दिन बुधवारी (दि.६) सकाळी ११ वाजता दै.झाडाझडती कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य प्रतिनिधी डॉ.धनाजी चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार हनुमंत चिटणीस यांची उपस्थिती होती. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष विलास चव्हाण, विभागीय कार्याध्यक्ष गिरीराज भगत , विभागीय उपाध्यक्ष विशाल माने, संघाचे सचिव विवेक मुंदडा, अनिल दाभाडकर, अरूण रणखांबे,सोमेश्वर लोहकरे, मंदार कुलकर्णी, अंभोरे, भगीरथ बदर, दिलीप बारूळ आदींची उपस्थिती होती.


यावेळी डॉ.धनाजी चव्हाण म्हणाले की, मागील चार वर्षांपासून पत्रकारांना पत्रकार भवन मिळावे म्हणून सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु, कोर्टामध्ये  प्रकरण गेल्यामुळे पत्रकार भवन मिळण्यास विलंब होत आहे. लवकरच पत्रकारांना आपल्या हक्काचे पत्रकार भवन मिळणार आहे. तसेच पत्रकारांना हक्काचे घर मिळावे यासाठी पाठपुरावा प्रशासनाकडे सुरू असून लवकरच पत्रकारांना घर बांधण्यासाठी महाडाची जागा उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.


विलास चव्हाण म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात सोशल मिडियावर तात्काळ माहिती वाचकांना मिळत आहे. परंतु, या सोशल माध्यमातून मिळणारी माहिती अनेक वेळा चुकीच्या असल्याचे निर्देशनात येत आहेत. तसेच या सोशल मिडियातून अनेकांची बदनामीही होत आहे. आजही खऱ्या अर्थाने दैनिकांनी बातम्याची विश्वासर्हता टिकून ठेवली आहे.दैनिकांत छापून आलेल्या बातम्यावरच वाचकांचा विश्वास आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.


गिरिराज भगत म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र ६ जानेवारी १९३२ रोजी सुरू केले होते.हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून प्रकाशित होत होते. त्यांना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. आजच्या पत्रकारांनी असे त्यांनी यावेळी सांगितले.फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता. हनुमंत चिटणीस,विशाल माने, अनिल दाभाडकर, विवेक मुंदडा, अरुण रणखांबे यांनी मनोगत व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून नागरिकांसाठी सुविधा


जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या बातम्यांची निवेदने व फोटो प्रत्येक कार्यालयामध्ये जावून द्यावी लागतात. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैस मोठ्या प्रमाणावर खर्ची होतो. सर्वसामान्यांचा वेळ व पैसा वाचावा यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने येथील जिल्हा कार्यालयात निवेदनाच्या बातम्या करून सर्व वर्तमानपत्राच्या ईमेलवर पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.