उस्मानच्या छेडाछेडीने निकिताचा गेला जीव..

1 min read

उस्मानच्या छेडाछेडीने निकिताचा गेला जीव..

बीड जिल्ह्यातील परळीत उस्मान शेख या मुलाकडून फोनवर छेडछाड होत असल्याच्या कारनावरून मुलीला गळफास घ्यावा लागला.. काय घडले नेमके

परळीः नर्सिंगचे शिक्षण घेत असताना छेडत असलेला मुलगा गावी आल्यावर सतत फोनवर त्रास देऊ लागल्याने परळीतील एका तरूणीला चक्क आत्महत्या करावी लागली आहे.
परळी येथील निकिता जगतकर ही मुलगी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. लॉक डाऊनमुळे ती सध्या घरातच होती. याकाळात इस्लामपूर येथील उस्मान नावाचा मुलगा सतत तिला फोन करून त्रास देत होता. या त्रासाला ती कंटाळली होती. तिने ही बाब आपल्या वडिलांच्या कानावर देखील घातली. वडिलांना त्याचा फोन घेऊ नकोस असा सल्ला देत त्याला जाब विचारायला जाण्याचा निर्णय घेतला. पण याच काळात निकिताने आपले जीवनच संपवले आपल्या राहत्या घरात गळफास लाऊन तिने आपले जीवन संपवले.
आपल्या मुलीच्या मृत्यूस उस्मान लतीफ शेख हाच जबाबदार असल्याचा आरोप करत सखाराम जगतकर यांनी आत्महत्येस पृवृत्त केल्याचा आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची बातमी समजताच उस्मान शेख हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.