परळी भाजपच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप

ग्रामस्थांनी पंकजा मुंडेंना आशीर्वाद देत मानले आभार...

परळी भाजपच्या वतीने पूरग्रस्तांना  अन्नधान्याचे किट वाटप

परळी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी काल रवाना केलेले अन्नधान्य व इतर जीवनावश्यक साहित्य आज परळी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर मधील पूरग्रस्त गावांत प्रत्यक्ष जाऊन वाटप केले. या मदतीमुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी पंकजा मुंडेंना आशीर्वाद देत त्यांचे मनोमन आभार मानले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात नुकतीच मदतफेरी काढण्यात आली होती. या फेरीत जमा झालेली रक्कम, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचे स्वतःचे आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे योगदान अशा एकत्रित रकमेतून गव्हाचे पीठ, तांदूळ, तूर दाळीसह २२० क्विंटल अन्नधान्य व इतर जीवनावश्यक साहित्य घेऊन काल दोन ट्रक दुपारी परळी येथून कोल्हापूरकडे रवाना झाले होते. ट्रकसोबत शहरातील सचिन गित्ते, नितीन समशेट्टी, प्रितेश तोतला, अनिष अग्रवाल,योगेश पांडकर, प्रल्हाद सुरवसे, नरेश पिंपळे, गोविंद चौरे आदी कार्यकर्ते गेले होते. या सर्वांनी कोल्हापूर येथील बापट कॅम्प, कुंभारवाडी, जाधववाडी, आंबेवाडी, चिखली आदी ठिकाणी पुरग्रस्तांना मदत वाटप केली. कोल्हापूरचे माजी खा. धनंजय महाडिक, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव,तारा राणी आघाडीचे गट नेते सत्यजित कदम, दत्ताजी आवळे, नगरसेवक राजसिंह शेळके, प्रकाश कुंभार, वैभव माने,संदीप कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.

ग्रामस्थांकडून पंकजांचे आभार
पूरग्रस्तांवर ओढावलेल्या संकटात धावून जात पंकजा मुंडे यांनी ही मोलाची मदत पाठविल्याने शहर व ग्रामीण भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला. या सर्व ग्रामस्थांनी परळीतील कार्यकर्त्यांजवळ आपल्या भावना व्यक्त करत पंकजा मुंडेना आशीर्वाद देत त्यांचे मनोमन आभार मानले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.