संसदीय पावसाळी अधिवेशनाला सुरूवात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत आज फॅक्टरिंग रेग्युलेशन विधेयक, २००० सादर करणार आहेत.

संसदीय पावसाळी अधिवेशनाला सुरूवात

दिल्लीः आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय. विरोधकांकडून शेतकऱ्यांचे प्रश्न, लसीकरण धोरण आणि महागाईच्या मुद्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी करण्यात आलीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सदनात शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. कोरोनाची लस घ्या आणि बाहुबली बना, असे आवाहन देशवासियांना करतानाच संसदेत कळीचे प्रश्न विचारा. पण उत्तरे देण्याची सरकारला संधीही द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केले होते.

अधिवेशनातील मुद्दे
-लोकसभेच्या व्यवसाय सल्लागार समितीची बैठक आज दुपारी २.०० वाजता तर राज्यसभा व्यवसाय सल्लागार
समितीची बैठक सायंकाळी ४.०० वाजता पार पडेल

-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत आज फॅक्टरिंग रेग्युलेशन (दुरुस्ती) विधेयक, २००० सादर करणार आहेत.

-संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आपल्या नियमित वेळेत अर्थात ११.०० वाजता सुरू होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सदनांत खासदारांसाठी पब्लिक गॅलरीमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आलीय.

-पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १०.०० वाजता संसद भवनात उपस्थित होणार आहेत.

-संसद अधिवेशनात एकूण ३१ विधेयकांवर संसद सभागृहांत चर्चा होण्याची शक्यता आहे. यातील सहा विधेयकं अशी आहेत जी अध्यादेशांच्या ऐवजी मांडली जाणार आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.