औरंगाबादेत ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन

११ मार्चपासून ४ एप्रिल पर्यन्त रात्री ९ नंतर शहर १००% राहणार बंद

औरंगाबादेत ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभुमीवर सोमवारपासून कडक लॉकडाऊन लागणार अशी अफवा काल दि.६ रोजी सर्वत्र पसरली होती. नंतर प्रशासनाने समोर येत आज बैठकीनंतर निर्णय जाहीर करू असे सांगितले होते.

आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निवासस्थानी 'देवगिरी' बंगल्यावर मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांची बैठक पार पडली.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माहिती दिली,

  • औरंगाबादमध्ये ११ मार्चपासून शहरात अंशतः लॉकडाऊन असणार.

  • ४ एप्रिल पर्यन्त सकाळी ६ पासून रात्री ९ पर्यन्त सर्व राहणार सुरु, नियम पाळणे मात्र गरजेचे.

  • प्रत्येक शनिवारी व रविवारी पूर्ण लॉकडाऊन

  • आठवडी बाजार, जलतरण तलाव, सर्व कार्यक्रम, आंदोलन, मोर्चे, शाळा, महाविद्यालये, मॉल बंद.

  • ज्या आस्थापना सुरु आहेत त्यांना दर १५ दिवसाला आर टी पी सी आर टेस्ट करणे गरजेचे.

  • शहरातील लॉन, मंगल कार्यालय पूर्णतः बंद राहणार, रजिस्टर मॅरेज करण्यासाठी व्यवस्था उभारणार.

  • रिक्षा वाहतुकीवर निर्बंध, मास्क आणि प्रवाशी संख्या नियमानुसार असणें बंधनकारक.

  • बुधवारपासून ७ दिवस जाधवमंडी राहणार संपूर्ण बंद.

  • सगळे मॉल्स राहणार बंद.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.