अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनात सहभागी व्हावे - डॉ शिवाजी हुसे

आंदोलनात सहभागी होण्याचे केले आवाहन..

अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनात सहभागी व्हावे - डॉ शिवाजी हुसे

औरंगाबाद : चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी आपल्या पत्नी व मुलाबाळांसह आत्महत्या केली होती. ही राज्यातील पहिली सामूहिक शेतकरी आत्महत्या असून या घटनेला ३५ वर्ष झाले आहे. तरी आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबले नाही. शेतकऱ्यांची अवस्था दिवसे दिवस अत्यंत बिकट होत आहे. महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील यांनी पत्नी व चार मुलांसह वर्धा येथील कुष्ठधाम येथे १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली.

सतत होणाऱ्या शेतक-यांच्या आत्महत्यांकडे शासन, प्रशासन, व समाज यांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते मा. अमर हबीब यांच्या नेतृत्वात १९ मार्च रोजी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले जाते .

या आंदोलनात एक दिवस उपवास करून, आहे त्या ठिकाणाहून कुणीही व्यक्ती सहभागी होऊ शकतो. आपल्या घरी अगर जिथे असेल तिथे उपवास पाळून यात सहभागी होता येते. हे कुठल्या पक्षाचे, संघटनेचे आंदोलन नाही. शेतकरी समाजाविषयी आस्था असणारे शेतकरी, युवक, विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, पत्रकार, किसानपुत्र, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि संवेदनशील नागरिकांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांप्रती आपली सहवेदना व्यक्त करावी. असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवाजी हुसे यांनी केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.