पंतजली कोरोना वरील पहिले आयुर्वेदिक औषध आज जगासमोर आणणार

1 min read

पंतजली कोरोना वरील पहिले आयुर्वेदिक औषध आज जगासमोर आणणार

आज दुपारी 12 वाजता आचार्य बाळकृष्ण औषध करणार लॉच

नवी दिल्ली: पंतजली कोरोनावरील पहिले आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ आज जगासमोर आणणार आहे. आचार्य बाळकृष्ण हे पंतजलीच्या हरिद्वार योगपीठातून हे औषध लॉच करणार आहेत. आचार्य बाळकृष्ण यांनी ट्विटवरून याबाबत माहिती दिली.गिलॉय आणि अश्वगंधाच्या मदतीने कोरोना व्हायरस वर खात्रीने उपचार होऊ शकतो असा दावा योगगुरू रामदेव बाबांनी केला होता. कोरोना विषाणू शरीरात शिरताच तो आतील यंत्रणेला त्रास देता आणि विषाणूचा गुणाकार होतो. जास्त्तित जास्त पेशींना संक्रमित करतो आणि ही साखळी तोडण्याच काम ‘गिलॉय’ वनऔषधी 100% करू शकते असेही रामदेव बाबा म्हणाले आहेत.