पाथरी तालुक्यात वाळूमाफिया सुसाट

1 min read

पाथरी तालुक्यात वाळूमाफिया सुसाट

तहसीलदार कट्टे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा*

सिद्धेश्वर गिरी/प्रतिनिधी: दक्षिण काशी म्हणून ओळख असणा-या गोदावरीमधून मोठ्या प्रमाणात होणा-या अवैध रेती उपस्याने कळस गाठला आहे. अवैध वाळू उपस्यामुळे महसूल विभाग व पाथरी पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. पाथरी येथील प्रभारी उपविभागीय अधिका-यांच्या कडून कार्यवाही होत नसल्याने कायमस्वरुपी कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.यापूर्वी कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे व्यंकट कोळी हे राजकीय बळी ठरल्याने ते वैद्यकीय रजेवर गेले होते. त्यांचा पदभार सेलुचे उपविभागीय अधिकारी म्हणून परिचित असणारे उमाकांत पारधी यांना भेटला होता.मात्र कार्यक्षेत्र मोठे असल्याने पारधी यांच्यावर वाळूमाफीयांनी पाळत ठेवून आपले उखळ पांढरे करण्याचा प्रकार चालवलेला आहे,यात विटा(बु.),लिंबा,तारुगव्हाण,डाकूपिंपरी,मुदगल आदी ठिकाणी वाळू उपसा जोमात सुरू असून झालेल्या उपस्याची ड्रोन कॉमे-याने मोजनी करुन संबधिंतावर अधिभार निच्छित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
तहसीलदार कट्टे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा
पाथरी तहसीलचा पदभारही प्रभारी असल्याने व बढती मिळालेल्या अधिका-याला पदभार भेटल्याने कार्यवाही होत नाही त्यामुळे गाव पातळीवर वाळूमाफियांनी आपले जाळे पसरवले असुन कार्यवाही करण्याची मागणी करताच किंवा गोपनीय माहीती देताच पाथरीचे तहसीलदार सुभाष कट्टे तक्रारदाराचे नाव व मोबाईल क्रंमाक वाळूमाफीयांना देतात यामुळे अंतर्गत वाद वाढत असल्याची असंख्य उदाहरणे घडलेली आहेत.यामुळे तहसीलदार सुभाष कट्टे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार झाला आहे.
WhatsApp-Image-2020-07-03-at-1.28.44-PM