खडसेंच्या टीकेला, पाटलांच प्रत्युत्तर

भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभद नाहीत, असले तरी ते सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत

खडसेंच्या टीकेला, पाटलांच प्रत्युत्तर

पुणे : काही महीन्यांपुर्वी भाजपला रामराम ठोकत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तेव्हापासुन दोन्ही बाजुंनी संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर टीका करण्याचे सत्र सुरुच आहे. खडसेंनी भाजप मध्ये अस्वस्थता असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'नाथाभाऊ आमचे नेते आहेत, तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलावं,' अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

पुण्यात आयोजीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. 'भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभद नाहीत, असले तरी ते सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. गेल्या दिड वर्षात आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपुरही जिंकलो, आमच्यात कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही,' असं त्यांनी यावेळी स्पष्ट केेले. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नाही, प्रत्येकाला प्रेससमोर येण्याची घाई असते अशी टिकाही त्यांनी केली.

'उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारने करावी असे वाटते. आधी राज्याने 10 रुपये इंधनाचा कर कमी करावा मग केंद्राकडे 5 रुपये इंधनदर कमी करण्याची मागणी करावी,' अशा शब्दांत त्यांनी इंधन दरवाढीविरोधातील काँग्रेसच्या आंदोलनावर टिका केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.