पवनदीप ठरला १२ वा इंडियन आयडॉल

इंडियन आयडॉल 12’वा सीझनचा विजेता पवनदीप ठरला.

पवनदीप ठरला १२ वा इंडियन आयडॉल

मुंबईः इंडियन आयडॉल 12’वा सीझन संपला आहे .ज्याची संपूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत होता. इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनचा विजेता घोषित करण्यात आला झाला आहे. पवनदीप राजनने इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. पवनदीपने नेहमीच आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत आणि प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केले आहे.

पवनदीप राजन, सयाली कांबळे, दानिश खान, अरुणिता कांजीलाल, निहाल तोरो ,षण्मुखप्रिया हे इंडियन आयडलचे फायनलिस्ट होते. गायक अनु मलिक, सोनू कक्कड आणि हिमेश रेशमिया यांच्या उपस्थितीत शोचा विनर निवडण्यात आला. या सर्वांनी मन जिंकली आहेत.

इडियन आयडलचा फायनल एपिसोड 12 तासांहून अधिक काळ सुरु राहिला. या दरम्यान कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रापासून कुमार सानू, अल्का यागनिक आणि उदित नारायण यांसारख्या दिग्गज गायकांनी उपस्थिती लावली होती. याव्यतिरिक्त शोमध्ये द ग्रेट खलीही उपस्थित होता. शोमध्ये खलीला पाहून सर्वजण हैराण झाले होते. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी हे देखिल उपस्थित होते.शोचे जज अनु मलिक, सोनू कक्कडही या दरम्यान उपस्थित होते. परंतु, सोनु कक्कडपूर्वी शो जज करणारी गायिका नेहा कक्कड मात्र अनुपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.