राज्यातील लोकांनी दिल्ली आणि केरळपासून काही शिकावे - आरोग्यमंत्री टोपे

1 min read

राज्यातील लोकांनी दिल्ली आणि केरळपासून काही शिकावे - आरोग्यमंत्री टोपे

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही दोन दिवसांत चिंताजनक वाढ झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर जनतेला खबरदारीचा इशारा दिला आहे.

सुमित दंडुके / राजधानी दिल्लीत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही दोन दिवसांत चिंताजनक वाढ झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर जनतेला खबरदारीचा इशारा दिला आहे. राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते यावेळी राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी चिंता व्यक्त केली. 'सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिल्लीत वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे खबरदारी घेण्यास महाराष्ट्र सरकारने सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दिल्ली आणि केरळकडे बघून शिकावे, असे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी नागरिकांना केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव केरळ आणि दिल्लीमध्ये वाढत आहे. मास्कचा वापर टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याकडेही अशी परिस्थिती होऊ नये म्हणून नागरिकांनी वेळीच खबरदारी घेत नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असेही टोपे यावेळी म्हणाले.