पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच

पेट्रोलच्या किंमतीमध्ये ३० ते ३९ पैसे आणि डिझेलच्या दरात २४ ते ३२ पैशांची वाढ...

पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच

नवी दिल्ली : एका दिवसाच्या स्थिरतेनंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये ३० ते ३९ पैसे आणि डिझेलच्या दरात २४ ते ३२ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी १०६.९३ आणि डिझेलसाठी ९७.४६ रुपये मोजावे लागतील. यापूर्वी बुधवार आणि गुरुवारी इंधनाच्या दरात वाढ होताना पाहायला मिळाली होती. त्यानंतर कालच्या दिवसात इंधनाचे दर स्थिर होते.

जुलै महिना उजाडल्यापासून पेट्रोलच्या दरात सहावेळा तर डिझेलच्या दरात चारवेळा दरवाढ झाली आहे. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल १६ वेळा दरवाढ झाली होती. मे महिन्यातही इंधनाच्या दरात १६ वेळा वाढ झाल्याचं पहायला मिळालं होत.

सकाळी जाहीर होते पेट्रोलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमूद केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होत असते.

'या' प्रमुख शहरात पेट्रोल शंभरी पार
पेट्रोलने शंभरी गाठलेल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नईचा समावेश आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.