पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आज पुन्हा घेतली उसळी

गेल्या आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आज पुन्हा घेतली उसळी

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासुन पेट्रोल आणि डिझेस किंमतींमध्ये वाढ होत आहे. देशात आज पुन्हा एकदा पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलीटर दर ११२.७८ रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी १०३.६३ रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०६.८९ आणि ९५.६२ रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच १२० रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या कशा माहित कर जाणून घ्या
आता पेट्रोल-डिझेलची किंमत एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्हाला कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला RSP आणि तुमचा सिटी कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कळतील प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

दररोज सहा वाजता किंमती बदलतात
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. नवे दर सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टींची भर घातल्यानंतर किंमत जवळजवळ दुप्पट होत असतात. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत याच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज बदलतात.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.