फडणवीसांना माझ्या शुभेच्छा, दिल्लीत ते चांगलं काम करतील : जयंत पाटील

प्रत्येक समाजाचे काहीना काही प्रश्‍न आहेत. त्यामुळेेच समाज प्रगत कसा होईल यासाठी

फडणवीसांना माझ्या शुभेच्छा, दिल्लीत ते चांगलं काम करतील : जयंत पाटील

कोल्हापूर : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याचा मला आनंद वाटत आहे. ते दिल्लीत जाऊन चांगले काम करतील. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे शनिवारी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी ‘देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्षनेते किंवा माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत,’ असे मत नोंदवले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जयंत पाटील यांनी वरील प्रमाणे प्रतिक्रिया नोंदवली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर नागरिकत्व कायदा भूमिकेवरून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेत बदल झाला आहे का, अशी विचारणा केली असता जयंत पाटील म्हणाले, सीएए, एनआरसी याविषयी मी बोलणे उचित ठरणार नाही. याबाबत उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबतची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. बाकी, आमचे महा विकास आघाडीचे सरकार व्यवस्थित काम करीत आहे. त्यामध्ये कोणतीही धुसफूस नाही ,असा निर्वाळा त्यांनी दिला.

ब्राह्मण समाजातील अर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्‍या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यशासनाचे प्रयत्न राहतील. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजातील प्रमुख नेतृत्वांने पुढे यावे. या वाटचालीत राज्यकर्त्यांचे

Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper,Marathi News Paper in Mumbai
Loksatta.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos and photos.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.