फेसबुकचे नाव बदलणार?

२८ ऑक्टोबर रोजी कंपनीची वार्षिर मिटिंग

फेसबुकचे नाव बदलणार?

वॉशिंग्टन: जगभरातील अब्जावधी वापरकर्त्यामध्ये लोकप्रिय असलेल्या फेसबुक या सोशल माध्यमाचे नाव बदलण्यात येणार असल्याची चर्चा जगभर सुरू झाली आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीची वार्षिक बैठक २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या बैठकीत कंपनीचे नवीन नाव आणि बोधचिन्ह यांचे अनावरण करण्यात येणार आहे,असे सांगण्यात येत आहे. मात्र यावर फेसबुने अजुन कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिल आहे. दरम्यान, व्यवसायवृद्धीसाठी नावात बदल करणे ही सिलिकॉन व्हॅलीमध्ये सामान्य बाब असून, अनेक कंपन्यांनी नाव बदलेले आहेत. त्यामुळे फेसबुकनेही तोच प्रकार केल्यास आश्चर्य वाटायला नको, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.