प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या गांधी चौक भागामध्ये उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय समोर फळविक्रेते अतिक्रमण करून दादागिरी करीत असल्याची तक्रार हिंगोली नगर परिषदेकडे युवकांनी केली आहे. सदर अतिक्रमण वेळेत न काढल्यास नाईलाजाने कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा देखील दिला आहे.
शहराचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या गांधी चौक परिसरामध्ये एकमेव सार्वजनिक शौचालय आहे. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांसह, व्यापा-यां करीता ही एकमेव सुविधा आहे. अशा परिस्थितीमध्ये सदर शौचालया समोर फळ विक्रेते आपले हातगाडे उभे करून अतिक्रमण करीत आहेत. परिणामी नागरिकांना शौचालयात जाण्यासाठी रस्ता देखील शिल्लक राहत नाही. यासंदर्भात अनेकदा विनंती करून देखील गाडीचालक दादागिरी करून आपली गाडी बाजूला घेण्यास नकार देत आहेत. यामुळे संतप्त युवकांनी आज हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. वेळेमध्ये सदर अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा नाईलाजाने आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा या युवकांनी दिला आहे.
यावेळी दीपक बांगर मानकरी यांच्यासह मोहन बांगर, गजानन बेंगाळ, पंजाब बांगर,गणेश दराडे, विनायक चिकनकर, जीवन बांगर, खंडेराव घुगे, भारत शिरसाट, साई चौधरी आदी युवकांची उपस्थिती होती.
हिंगोली स्वच्छता गृहा समोरील फळगाडे उठवा
युवकांचे नगर परिषदेला निवेदन,अतिक्रमण वेळेत न काढल्यास नाईलाजाने कायदा हातात घ्यावा लागेल.

Loading...