पिकविमा वाटपाचा निर्णय स्थगीत

1 min read

पिकविमा वाटपाचा निर्णय स्थगीत

कोरोनाच्या प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेने निटूर शाखेला पिक विमा वाटुप करण्यास मनाई केली आहे. एनालायजरच्या वृत्ताचा हा परिणाम आहे.

निटूर /विजय देशमुख- analyser ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली असून पिक विमा व अनुदान वाटपाचा निर्णय ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला असून तसे संदेश शेतक-यांना पाठवण्यात आले आहेत.
जगभरामध्ये सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही या रोगाचे शंभर पेक्षा जास्त रूग्न आढळून आले आहेत.हा व्हायरस संसर्गजन्य असल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे त्यामुळे चार पेक्षा जास्त नागरीकांनी एकत्र येवू नये असा आदेश असताना निटूरच्या जिल्हा बँकेत अनुदान व पिक विमा वाटप सुरू होते. त्यामुळे बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी जमत होती त्यामुळे ग्राहकाबरोबर कर्मचारी वर्गाच्या जिवाला धोका निर्माण झाला होता म्हणून या संदर्भात analyser ने सचिञ वृत्त प्रकाशित केले होते त्या वृत्ताचा परीणाम म्हणून जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाने वाटप बंद करण्याचा आदेश दिला. व 31 मार्चच्या नंतर वाटप वाटप सुरू करण्याचा आदेश दिला.दारम्यान निटूर च्या जिल्हा बँकेला परीसरातील गावे जोडली असल्यामुळे त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी जमून बँकेत गोंधळ होत होता माञ या संदर्भात सत्य परिस्थिती मांडली असता त्याची दखल होवून वाटप 31 मार्च पर्यंत बंद करण्याचा सुचना केल्या आहेत