प्लीज मी जी चूक केली ती तुम्ही करू नका-अभिनेत्री अमृता धोंगडे

1 min read

प्लीज मी जी चूक केली ती तुम्ही करू नका-अभिनेत्री अमृता धोंगडे

मिसेस मुख्यमंत्री मधील सुमी म्हणजेच अमृता धोंगडे हिचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक.

‘मिसेस मुख्यमंत्री’ या मराठी मालिकेतील समरसिंह यांची पत्नीचे पात्र असलेली सुमी आणि ख-या आयुष्यात असलेली अमृता धोंगडे हिचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची माहिती तिने स्वत: फेसबुक पोस्ट करून दिली आहे.

हिच ती पोस्ट
नमस्कार मी अमृता धोंगडे.
म्हणजेच तुमची मिसेस मुख्यमंत्री मधील सुमी
काल म्हणजेच 28 ऑगस्ट ला मला दुपारी एक मेल आला Instagram verification साठी त्यानंतर लगेचच मला व्हाट्सअँप वर मेसेज आला तो नंबर
तुर्की चा होता. पण मला वाटलं तो खरंच इंस्टाग्राम वेरिफिकेशन साठी मेसेज आहे, म्हणून त्यांनी मला एक लिंक पाठवली या लिंक वर जाऊन चुकून मी माझं username आणि password दिला
आणि थोड्या वेळाने माझा अकाउंट मला दिसणं बंद झालं.
त्यानंतर त्याने मला दुसऱ्या‌ एका नंबर वरून मेसेज केला की तुझा अकाऊंट हे आमच्या ताब्यात आहे, आणि आम्ही जेवढे पैसे सांगतोय तेवढे दे आणि तुझा अकाउंट तुला परत घे.
त्यांनी मला 40,000 ची मागणी केली तेव्हा माझं account hacked झालं होतं .
मी काहीच करू शकले नाही, त्यामुळे मला माझे instagram चे पेज हे गमवावे लागले..
माझे इंस्टाग्राम वर फॉलोवर्स हे 77.6k एवढे होते.
त्यामुळे मी सर्वांना एक विनंती करेन प्लीज मी जी चूक केली ती तुम्ही करू नका, व कोणत्याही अफवांना बळी पडू नका .
आतापर्यंत तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम केलंय तसंच प्रेम इथून पुढेही राहू द्या.
मी इंस्टाग्राम च नवीन पेज बनवत आहे तरी तुम्ही सगळ्यांनी मला तिथे नक्की फॉलो करा.
अशी पोस्ट करून तिने याबद्दल माहिती दिली आणि एक विनंती करेन प्लीज मी जी चूक केली ती तुम्ही करू नका, व कोणत्याही अफवांना बळी पडू नका. असा सल्लाही तिने दिला आहे.