औरंगाबाद: आपल्या दारातून घंटागाडी किंवा कचरा संकलन करणाऱ्या रिक्षांना नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून देऊन सहकार्य करावे,अन्यथा एकत्र कचरा घेण्यात येणार नाही,अशी समज औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी गरम पाणी येथील नागरिकांना दिली.
प्रशासकांनी सिद्धार्थ प्राणी संग्रहालयास भेट दिली,त्यानंतर त्यांनी जवळच सुरू असलेले जलतरण तलावाची पाहणी केली. तिथून जात असताना एक कचरा संकलन करणारा रिक्षा त्यांच्या निदर्शनास आला. रिक्षा थांबवून त्यांनी त्यातील कचऱ्याची पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास आले की त्या रिक्षात ओला आणि सुका कचरा वेगळा नसून तो एकत्र कचरा आहे.
विचारणा केल्यावर त्यांना माहिती देण्यात आली की तेथील नागरिकांना वारंवार सूचना देऊनही नागरिक कचरा वेगळा करून देत नाही. यावेळी प्रशासकांनी तेथील रहिवाश्याना बोलावून घेतले आणि त्यांचे प्रभोदन केले.
'महानगरपालिका तुमच्या दारातून कचरा गोळा करते, जर तुम्ही ओला आणि सुका कचरा देऊन महानगरपालिकेला सहकार्य करत नसाल तर महानगरपालिका तुमच्या दारातून कचरा गोळा करणे बंद करून टाकेल. यावेळी उपस्थित रहिवास्यानी कचरा वेगळा करून देण्याचा शब्द प्रशासकांना दिला.