पंतप्रधान मोदींची महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

1 min read

पंतप्रधान मोदींची महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत तेथील कोरोना विषाणूच्या साथीची स्थिती जाणून घेण्यासाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये चर्चा सुरू केली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री या बैठकीत उपस्थित आहेत.
देशात एकूण कोरोना रूग्णांची संख्या 22 लाख 68 हजार 675 झाली आहे. आजपर्यत कोरोनामुळे देशभरात 45,257 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानूसार देशात 6 लाख 39 हजार 929 लोकांवर उपचार सुरू असून 15 लाख 83 हजार 489 लोक बरे झाले आहेत.