विषबाधा प्रकरण काळ्याचे पांढरे उखळ

1 min read

विषबाधा प्रकरण काळ्याचे पांढरे उखळ

नेमका दोष कोणाचा दुकानदार?आरोग्य प्रशासन?पोलिस प्रशासन

सिद्धेश्वर गिरी/सोनपेठ: हिंदू धर्मातील पवित्र वृत पाळून अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्रावण महिन्याचा आधार घेतला जातो. मात्र या महिन्यात वृत पाळत असताना यातून घडणाऱ्या गोष्टीमुळे काळ्याचे पांढरे उखळ होताना दिसून येत आहे. 11 ऑगस्ट मंगळवार रोजी सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथील तीस जणांना भगरीतून विषबाधा झाल्याची घटना घडली. या सर्व घटनेची पार्श्वभूमी पाहताना सर्व रुग्णांवर शासकीय उपचार होणे गरजेचे होते. मात्र खाजगी रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली त्या व्यापाऱ्यास मोठा आर्थिक भार सोसावा लागल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. यामुळे सोनपेठ तालुक्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेला झोपेच्या बाहेर काढण्याची गरज निर्माण झाली असून सोनपेठ तालुक्याला आरोग्य यंत्रणेची घरघर लागली आहे का?असा सवालही सामान्य नागरिकांमधून व्यक्त केल्या जाऊ लागला आहे. या सर्व प्रकरणात आकड्याची मोड करण्यात येऊन विषबाधितांचा खरा आकडा लपवण्यात आल्याची चर्चाही होत आहे. तर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून आपले हात रंगवले असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. या सर्व प्रकारावर नेमका दोष कोणाचा म्हणण्याची वेळ आली असून यात पोलिस योग्य प्रकरणाचा छडा लावतील काय? सलाईनवर असणाऱ्या आरोग्य यंत्रणेला जाग येईल का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दरम्यान लपवलेला खरा आकडा समोर येणे हेही महत्वाचे असून एका खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे. मात्र राज्याने लागू केलेल्या आरोग्य कायद्याची सोनपेठमध्ये अवहेलना होत आहे का?असा नवा सवालही चर्चेतून व्यक्त होत आहे.