बेशिस्त पार्किग,अवैद्य दारू विक्रीवर पोलिसांची कार्यवाही

रहदारीच्या ठिकाणी वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कार्यवाही

बेशिस्त पार्किग,अवैद्य दारू विक्रीवर पोलिसांची कार्यवाही

निटूर / विजय देशमुख : निलंगा निटूर लातूर राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्त पार्किंग करुन वाहने लावून वाहतूकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी चार वाहनावार तसेच वांजरखेडा ता. निलंगा येथे अवैध देशी दारु विक्री प्रकरणी निटुर पोलि्सांनी गुन्हा दाखल केला आहे. निटुर येथे मुख्य महामार्गावर रहदारीच्या ठिकाणी वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी ही कार्यवाही करण्यात आली.

जहिराबाद निटूर लातूर या महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे कांही ठिकाणी पुलाचे काम सोडले तर सर्व रस्ता वाहतूकीसाठी खूला करण्यात आला आहे माञ निटूर येथे मुख्य रस्त्यावर अवैद्य प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच इतरही वाहने रस्त्यावर लावून रस्याची एक बाजू पूर्णपणे बंद झाली होती परीणामी एवढा मोठा रस्ता होवूनही वाहतूक एकाच बाजूने सुरू होती.मागील कांही दिवसापूर्वी एस टी महामंडळाने निटूरच्या बेसीस्त वाहतूकी संदर्भात पञ ही दिले होते ज्यामुळे एस टी फिरण्यास अडचण होत असल्याचे निदर्शनास आनून दिले होते.

दरम्यान निटूर पोलिस चौकिचे पोलिस जमादार सत्यवान कांबने , पो का. अस्लम सय्यद , पो काॕ , हारी कांबळवाड, शिवानंद गिरवणे यांनी निटूरच्या चार वाहनावर कलम २८३ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे निटूर मधील वाहतूक व्यवस्था दोन्ही बाजूंनी सुरळीत सुरूवात झाली आहे. याच दरम्यान वांजरखेडा येथील हाणमंत सुरवसे यांच्यावर संबंधित पोलिसांनी धाड मारून अवैद्य देशी दारू च्या ४० बाटल्या जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.