लाखोंची अवैध तंबाखु विक्री करणारा पोलिसांच्या ताब्यात

1 min read

लाखोंची अवैध तंबाखु विक्री करणारा पोलिसांच्या ताब्यात

२ लाख ८२ हजारांचा अवैध सुगंधी तंबाखु साठा जप्त ; जिन्सी पोलिसांची मोठी कारवाई

सुमित दंडुके / औरंगाबाद : शहरातील रोशनगेट भागातील वाहेद कॉलनी येथील अब्दुल अजीम अब्दुल मजीद (वय ३६) यांच्याकडे अवैध तंबाखू साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी आणि जिन्सी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत सदरील आरोपीच्या घरी छापा मारला तेव्हा तब्ब्ल २ लाख ८२ हजारांचा अवैध सुगंधी तंबाखु साठा आढळून आला. पोलिसांनी त्वरित साठा जप्त करीत आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा साठा बाजारात विकण्यास घेऊन जाणार असल्याची कबुली दिली. त्यावरून आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरील कामगिरी पोलीस निरीक्षक व्ही.एम.केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि सहकार्यांनी यशस्वी पार पाडली.