फिल्मीस्टाईल पाठलाग करुन पोलीसांनी पकडला ३७ किलो गांजा

आंध्रातून शहरात विक्रीसाठी आणत होते गांजा, औरंगाबाद शहर गुन्हे शाखेने पाठलाग करुन पकडले आरोपी...

फिल्मीस्टाईल पाठलाग करुन पोलीसांनी पकडला ३७ किलो गांजा

औरंगाबाद : शहरात सध्या अवैद्य धंदे आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काल रविवारी (दि.६) रोजी परराज्यातून कारमध्ये शहरात गांजा आणून विक्री करणाऱ्या दोन जणांना गुन्हेशाखा पोलिसांनी पहाटे सापळा रचून अटक केली आहे. तर त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी ३७ किलो ३०० ग्रॅम गांजासह १२ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे यांनी दिली आहे.

श्रीकांत लक्ष्मण बनसोडे(३१), जगन्नाथ श्रीमंत लाटे(३६,दोघे रा.चौधरी कॉलनी,चिकलठाणा) अशी आरोपींची नावे आहेत. कार क्रमांक (एमएच.२०.एए.४४१३) मधून आंध्र प्रदेशातील दाराकोंडा येथून चार जण गांजा घेऊन शहरात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, पोलिस अंमलदार ओमप्रकाश बनकर, विरेश बने, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, बबन ईप्पर, दादासाहेब झारगड आदींच्या पथकाने केंब्रिज चौकात सापळा लावला होता.

पोलिसांना पाहताच कार चालकाने कार बीड बायपासवरून जुन्या व बंद असलेल्या वळण रस्त्याने चिकलठाण्याकडे घातली. पोलिसांनी कारचा पाठलाग करून गोपालनगर येथे कार अडवली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत कारची झडती घेतली असता १ लाख ८६ हजार ५०० रुपये किमतीचा ३७ किलो ३०० ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी कार, गांजा, एक मोबाईल असा एकूण १२ लाख ४६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंधन दरवाढी विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन
आंदोलनात कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांची उपस्थिती...

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.